महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीपद त्यांच्याकडे आहे. Covid-19 वरील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.मराठवाडयात नांदेडला परतण्याआधी अशोक चव्हाण मुंबईत काही बैठकांना उपस्थित होते. अशोक चव्हाण यांना विशेष रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं. “अशोक चव्हाण यांच्यामध्ये करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.